राज ठाकरेंनी काहीही सांगितले तरी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सक्षम : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

राज ठाकरे यांनी काहीही सांगितले तरी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. त्यामुळे ती बिघडविण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्याच्यावर पोलीस विभाग कठोर कारवाई करेल, असा इशारा शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई देसाई यांनी दिला आहे.

औरंगाबाद या ठिकाणी नुकतीच राज ठाकरे यांची सभा पार पडली. त्यांच्या या सभेची तुलना स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेशी राज ठाकरे यांच्या सभेशी केली जात आहे. याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथे माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, काल कोणीतरी आलेल्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेशी तुलना करू नये. बाळासाहेबांच्या सभांना लोक मांड्या घालून बसायचे. आणि कालच्या या सभेला लांब लांब खुर्च्या आणि बॅरिकेट्स लावून घेतल्या जात असल्याची टीका देसाई यांनी केली आहे

शिवसेनेत हिंदुत्व राहिले नाही अशी जी टीका होते आहे या प्रश्नावर मंत्री देसाई यांनी उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले कि, आमच्यातून बाहेर जाऊन घर थाटणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असे म्हणत देसाई यांनी टोला लगावला आहे.