हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत विजय झालाय. शरद पवार हे अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार होते. या निवडणुकीत 34 पैकी 31 जणांनी मतदान केलं. त्यात शरद पवार यांना तब्बल 29 मते मिळली, तर धनंजय शिंदे यांना 2 मतं मिळाली आहे. शरद पवार गेली ४० वर्षे ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी आहेत.
मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तयार झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीत एकूण ३४ जणांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. त्यापैकी ३१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये फक्त दोन मते शिंदे यांना मिळाली.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीवेळी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र ही साखर कारखाने किंवा बँकेची निवडणूक नाही. सरस्वतीच्या संस्थेमध्ये गैरप्रकार सुरु असून याविरोधात न्यालयात जाणार असल्याचा इशारा धनंजय शिंदे यांनी दिला आहे.