हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत 2019 निवडणूकीनंतर च्या सत्तास्थापनेबद्दल अनेक गुपितांचा खुलासा केला. यावेळी अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या शपथविधी साठी तुम्हीच पाठवलं होत का असा सवाल शरद पवारांना केला असता त्यांनी त्या अवघड प्रश्नावर देखील तात्काळ उत्तर दिले.
शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत पाठवलं अशी चर्चा असते हे खरं आहे. पण मी त्यांना पाठवलं असतं तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. मी अजित पवार यांना पाठवलं होतं यात काहीच अर्थ नाही. तेव्हा तसं होण्यामागे प्रमुख २ कारणं होती. असे पवार म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी ला सत्तास्थापनेची ऑफर दिली होती.पण आमची भूमिका वेगळी आहे त्यामुळे आम्हाला हे शक्य नाही असे मी मोदींना सांगितले होते असेही पवारांनी म्हंटल.