भरारी पथकाकडून बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त

औरंगाबाद – नवीन वर्षानिमित्त बनावट दारू विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. अटकेत असलेल्या दोघांच्या ताब्यातून एक कार दुचाकी आणि बनावट दारूचा साठा असा तब्बल 8 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली.

या कारवाईत वैभव परशुराम खरात राहुल पांडुरंग वालझाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर सागर संतोष जयस्वाल दत्ता नानासाहेब वारे अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. पडेगाव मिटमिटा रोडवर चार्जर नवीन वर्षाच्या निमित्ताने बनावट दारू विक्री करण्यासाठी आली असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

ही कारवाई निरीक्षक रोकडे, दुय्यम निरीक्षक डहाके, शरद रोटे, रमेश विठोरे, जवान युवराज गुंजाळ, रवींद्र मुरडकर, भास्कर काकड, सुभाष गुंजाळ, शारेक कादरी, संजय गायकवाड, अमोल अन्नदाते यांच्या पथकाने केली.