हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव आज निधन झालं. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. मुलायमसिंह यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुःख व्यक्त केलं. मुलायमसिंह यांच्या निधनाने समाजवादी चळवळीच मोठं नुकसान झालं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्या राजकीय विचारांवर मुलायम सिंह यादव राजकारण केलं. उत्तर प्रदेशचे विरोधी पक्षनेते ते मुख्यमंत्री अशी जबाबदारी त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळली. त्यानंतर त्यांनी देशाच्या राजकारणात लक्ष्य दिले . संसदेत झुंजार, प्रभावी अशा प्रतिमेचं दर्शन त्यांनी देशातील नागरिकांना दिलं. देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. सध्या देशातील विरोधी पक्षाला एकत्र आणण्याची मुलायमसिंह यादव यांची इच्छा होती. मात्र, त्याआधीच ते आपल्यातून गेले. त्यामुळे समाजवादी चळवळीच मोठं नुकसान झालं. आमचा सहकारी आज आमच्यातून निघून गेला याच मला दुःख आहे असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुलायमसिंह यांच्या निधनाने दुःख व्यक्त केलं आहे. श्री मुलायम सिंह यादवजी हे एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व होते. लोकांच्या समस्यांप्रती संवेदनशील असणारा एक नम्र आणि तळमळीचा नेता म्हणून त्यांची सर्वत्र प्रशंसा झाली. त्यांनी तत्परतेने लोकांची सेवा केली आणि लोकनायक जेपी आणि डॉ. लोहिया यांच्या आदर्शांना लोकप्रिय करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या निधनाने मला वेदना होत आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो समर्थकांच्या संवेदना. ओम शांती असं म्हणत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केली.