शरद पवार 8 आणि 9 मे ला सातारा दौऱ्यावर; पहा संपूर्ण कार्यक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 8 आणि 9 मे ला सातारा दौऱ्यावर येणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवार साताऱ्यात येणार असून यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अजित पवार हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार प्रथमच सातारा दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागलं आहे.

8 आणि 9 मे दरम्यान शरद पवार साताऱ्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाच्या निमित्ताने पवारांचा हा दौरा असला तरी राजकीय पटलावर या दौऱ्याची उत्कंठा शिगेला लागली आहे. गेल्या आठवड्याभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. यामुळे सातारा दौऱ्यात पवार नवीन काय राजकीय डावपेच करणार का? याकडे सुद्धा लक्ष्य लागलं आहे.

कसा असेल शरद पवारांचा सातारा दौरा –

सोमवार ८ मे २०२३

संध्याकाळी ५ : ३० वाजता – सातारा सैनिक स्कुल येथे आगमन
संध्याकाळी ६ : ०० वाजता- रयत शिक्षण संस्थेची अनौपचारिक बैठक
त्यानंतर रात्री सर्किट हाऊस येथे मुक्काम

मंगळवार ९ मे २०२३

सकाळी 08 : 30 वाजता कै.कर्मवीर भाऊराव पाटील सातारा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
8: 45- 10: 30 कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी सोहळा
11: 00 वाजता – रयत शिक्षण संस्था सातारा ची वार्षिक सर्वसाधारण सभा
12: 15 ते 12: 30- सातारा हुन जकातवाडी येथे जाणार
1230 वाजता – भारतीय भटके-विमुक्त विकास-संशोधन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा
श्री. कुमार केतकर यांना फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार
03:30 वाजता – जकातवाडी हुन साताऱ्याच्या दिशेने रवाना
03: 55 वाजता – सातारा येथे आगमन
04: 00 वाजता – सातारा सैनिक स्कूल हेलिपॅड, येथे आगमन
04: 30 वाजता – पुन्हा बारामतीला पोचणार