हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर त्यांच्यापुढे मोठं संकट उभं राहिले आहे. मात्र या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. शरद पवार यांनी स्वतः फोनवरून उद्धव ठाकरेंशी चर्चा केली तसेच महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी उभी आहे असा दिलासाही दिला. TV 9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्याच्या कायदेशीर पेचाबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी महाविकास आघाडी तुमच्या पाठीमागे पुर्णपणे उभी आहे, असा दिलासा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे संकटाच्या काळात पुन्हा एकदा शरद पवार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं असल्याचे दिसून आले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे याना दिल्यांनतर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणुक आयोगाच्या या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला आहे. यावर आज ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठवले. पण सुप्रीम कोर्टानं आज याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने त्यांना उद्या येण्याचे निर्देश दिले.