शरद पवारांकडून राज्यपालांचा समाचार; म्हणाले की त्यांनी…

Sharad Pawar Bhagatsinh Koshyari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात त्याचे मोठं राजकीय पडसाद उमटले. राज्यपालांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोश्यारींचा समाचार घेतला आहे. अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधाने करणं हे या राज्यपालांचं वैशिष्ट्ये आहे. आणि तसा त्यांचा लौकीक आहे असा टोला त्यांनी लगावला. शरद पवार मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यपाल जेव्हा बोलले तेव्हा तिथे मी आणि नितीन गडकरी होतो. त्यांनी तो उल्लेख केला. तो माझ्याबद्दल नव्हता. गडकरींबद्दल होता. राज्यपाल ही एक संस्थात्मक पद असलं तर विद्यमान राज्यपालांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं आहे. काल त्यांनी शिवाजी महाराजांचं कौतुक केलं. पण राज्यातून उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांना उशिरा सूचलेलं हे शहाणपण होतं. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यायला हवी असेही शरद पवार यांनी म्हटले.

दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालाच्या विधानाचा जोरदार समाचार घेतला आहे. देशाला जर महासत्ता बनवायची असेल तर शिवाजी महाराजांचे विचार महत्वाचे आहेत. शिवाजी महाराज अनेक महापुरुषांचे स्फूर्तीस्थान होते. मग आदर्श भारताची संकल्पना मांडणाऱ्या शिवरायांचे विचार जुने कसे?, असा सवाल करत राज्यपाल कोश्यारींना पदावरुन मुक्त करावे अशी मागणी उदयनराजे यांनी केली.