हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok sabha Election 2024) राज्यात भाजप आणि शिंदे गटाला अवघ्या 14 जागा जिंकता येतील आणि महाविकास आघाडीला तब्बल 34 जागांवर यश मिळेल असे अशी माहिती सी व्होटर आणि इंडिया टुडे च्या सर्वेक्षणात समोर आली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) याना विचारलं असता हा सर्वे दिशा दाखवणारा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आज कोल्हापुरात शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, हि जी सर्वे करणारी एजन्सी आहे त्यांची ऍक्युरीशी आपल्याला माहित आहे. या सर्वेने दिशा दाखवली आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या ती सोयीची नाही. बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांसोबत राहणार नाही हे यातून दिसतंय आणि सत्ताधाऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्र भाजपची झोप उडवणारे सर्वेक्षण; 2024 लोकसभेला मिळतील फक्त 'इतक्या' जागा
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/lk11GsPu7z#Hellomaharashtra @PawarSpeaks @NCPspeaks @ShivSena @INCMaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 27, 2023
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती झाली मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव स्वीकारला नाही अशा चर्चा सुरु होत्या त्याबाबत विचारलं असता पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमची चर्चाच झालेली नाही. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीचा प्रस्ताव आमच्याकडे आलाच नाही. त्यामुळे तो स्वीकारायचा कि नाही यावर चर्चा कशी करता येईल असा उलट सवाल त्यांनी केला.