विशेष प्रतिनिधी । राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी केवळ काही तास शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला असून सर्वच पक्ष मतदारराजापर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक पक्षांच्या सभा वेगवेगळ्या कारणाने गाजत आहेत. अशीच एक सभा सध्या शुक्रवार रात्रीपासून तुफान चर्चेत आहे ती म्हणजे साताऱ्यामध्ये झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची सभा.
पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा सुरु असताना मुसळधार पाऊस कोसळू लागला पण पवार थांबले नाही आणि त्यांनी आपले भाषण सुरुच ठेवले. पवारांचा भर पावसात भाषण देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. शनिवारी सकाळपासूनच #SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसला. त्यातच आता शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सभेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
सुप्रिया यांनी ट्विट करुन या सभेतील पवारांचा फोटो शेअर करत आपले मत व्यक्त केलं आहे. या सभेमुळे सर्वांनाच नवी उर्जा मिळाली आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. “साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय शरद पवार साहेबांना ऐकत होतं. ‘वारं फिरलंय, इतिहास घडणार’, हा संदेश देणाऱ्या या सभेनं राष्ट्रवादीच्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली,” असं ट्विट सुप्रिया यांनी केले आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासोबत धनंजय मुंडे , वंदना चव्हाण, डॉ. राजेंद्र शिंदे यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून शरद पवार यांच्या सभेबद्दल मत व्यक्त केले आहे. दरम्यान, पवारांनी या सभेत त्यांनी ‘लोकसभेला उद्यनराजेंना तिकीट देऊन मी चूक केली हे मान्य करतो. मात्र प्रत्येक सातारकर आता झालेली चूक सुधारण्यासाठी २१ तारखेची वाट पाहत आहे,’ असं मत व्यक्त केलं.
साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय @PawarSpeaks साहेबांना ऐकत होतं. ‘वारं फिरलंय,इतिहास घडणार’, हा संदेश देणाऱ्या या सभेनं @NCPspeaks च्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली. pic.twitter.com/yMF7kPd5qK
— Supriya Sule (@supriya_sule) October 18, 2019
मी म्हटलं होतं, ‘हवा बदलतेय’! याची प्रचिती आता सर्वांनाच आली. कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्येही आदरणीय @PawarSpeaks साहेबांनी सातारकरांना संबोधित केलं.उसळलेल्या अलोट जनसागरानं तितक्याच आत्मीयतेनं साहेबांच्या हाकेला प्रतिसाद दिला.असलं ऊर्जावान नेतृत्व आम्हाला लाभलं, हे आमचं भाग्यच! pic.twitter.com/lfSBibgTTP
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 19, 2019
सत्ताधाऱ्यांच्याही आता लक्षात आलंच असेल की साहेबांनी किती पावसाळे पाहिले आहेत ते!
मला सार्थ अभिमान आहे
मा. खा. शरदचंद्र पवार साहेब यांचा सच्चा कार्यकर्ता असल्याचा…@PawarSpeaks @NCPspeaks #MaharashtraElections2019 #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/HBwKIhYPXh— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 18, 2019
पवार साहेबांनी लढलेल्या या लढाईची देशाचा इतिहास नोंद घेईल ! साहेबांची हि लढाई येणाऱ्या पिढयांना कायम लढत राहण्याची प्रेरणा देईल !#राष्ट्रवादीपुन्हा pic.twitter.com/mQ1idb5Rai
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) October 18, 2019
आपली जिद्द नेहमी आमच्यातील कार्यकर्ता जगवत आली #साहेब … आज ही भर पावसात उपस्थितांना आपण संबोधित करत राहिला आणि आपल्यावर नितांत प्रेम करणारी सातारयाची जनता त्या भर पावसात आपल्या सोबत राहिली .. साहेब हीच आजची सभा इतिहास रचणार यात शंका नाही . @PawarSpeaks ???????? pic.twitter.com/7eYiKEt1UH
— Vandana Chavan (@MPVandanaChavan) October 18, 2019