हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच त्यांच्या अखंड कामासाठी ओळखले जातात. महाराष्ट्रातील कोणताही प्रश्न असो पवार नेहमीच सर्वात पुढे असतात. आता तर स्वतः हॉस्पिटलमध्ये असून देखील पवारांनी तिथे बसून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यातील अन्नधान्यांच्या साठ्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली. खुद्द भुजबळांनीच याबाबत माहिती दिली.
शरद पवारांवर शस्त्रक्रिया होऊन देखील त्यांनी आपल्या कामात कोणताही खंड पडू न देता राज्यातील कोरोना परिस्थीती विषयी चर्चा केली ” अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. शरद पवारांची प्रचंड इच्छाशक्तीच ही आम्हाला अधिक उत्स्फूर्तपणे काम करण्याचे बळ देते. ते यातून लवकर बरे होऊन पुन्हा त्याच जिद्दीने आपल्या सामाजिक कामाला सुरुवात करतील असा विश्वास आम्हा सर्वांना आहे”, असं देखील म्हणाले.
राज्यात कोरोनाची परिस्थीती बिकट होत असल्याने नागरिकांसाठी अतिरिक्त अन्नधान्य द्यावे लागले तर राज्यात सध्या असलेल्या अन्नधान्यांच्या साठ्याबाबत शरद पवार यांनी चर्चा केली, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून पुन्हा एकदा राज्याला कोणकोणत्या अतिरिक्त अन्नधान्यांची गरज आहे, केंद्र शासनाकडून अन्नधान्याबाबत करावयाची मागणी याबाबत देखील पवार आणि भुजबळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group