कराडला शरद पवार : स्व. यशवंतराव चव्हाण यांना समाधीस्थळी अभिवादन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथे तब्बल दोन वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार हे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी आज बुधवारी दि. 24 रोजी आले. उद्या गुरुवारी दि. 25 रोजी स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या अगोदरच एक दिवस शरद पवार समाधीला अभिवादन करण्यासाठी आले.

‌कराड येथे आज स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, पार्थ पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सातारचे दिपक पवार, सभापती प्रणव ताटे, पंचायत समिती सदस्य देवराज पाटील, रणजीत पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील, राजाभाऊ पाटील- उंडाळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित रहावे.

राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी वेणूताई चव्हाण स्मारक येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची धावती बैठक घेतली. शरद पवार हा दौरा केवळ काही मिनिटांतच झाला.