एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार?? अंतरिम पगारवाढ देण्याचा शासनाचा प्रस्ताव

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना परब म्हणाले की, विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. तिच्या निर्णयाचे उल्लंघन सरकार किंवा कर्मचारी करू शकत नाहीत. बारा आठवड्यांत समितीचा अंतरिम अहवाल आधी मुख्यमंत्री आणि नंतर न्यायालयासमोर मांडला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळेल का, वेळेत पगार होतील का, अशी भीती कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे समितीचा अहवाल येईपर्यंत अंतरिम पगारवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव सरकारने दिल्याचे परब यांनी सांगितले.

वेतन वेळेवर मिळाव. वेतन वाढावं अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. उच्च न्यायालयाने समिती बनवली आहे. समितीकडे सध्या हा विषय आहे. 12 आठवड्यात अहवाल द्यायचा आहे. मुख्यमंत्री तो कोर्टात सादर करेल. कोर्टाच्या आदेशाचं कोणीच उल्लंघन करू शकत नाही. कामगारांना जे जे हवं आहे ते आम्ही देत आहोत. एका बाजूने समितीची प्रक्रिया सुरू आहे. याला बराच कालावधी लागणार आहे. तिढा कायम राहू नये. तोपर्यंत दुसरा पर्याय असेल तर द्यावा. अंतरीम वाढ द्यायचाही पर्याय आहे, असं त्यांनी सांगितलं.