नागपूर प्रतिनिधी । अतिवृष्टीतने राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. विदर्भाला सुद्धा या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. याच अनुषंगाने विदर्भातील ओल्या दुष्काळानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी आज विदर्भातील काटोल भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला.
काटोल भागातील चारगाव गावात शरद पवार पोहोचले असता येथील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांनी पवार यांना घेराव घालत कापसाचे कसे नुकसान झाले आहे याबाबत त्याच्याशी संवाद साधला. तेजराव नारायण मोरे या शेतकऱ्याने कापसाचे पीक संपूर्ण नष्ट झाले असून उरलेल्या कापसाची बाजारात काहीच किंमत मिळत नसल्याचे सांगीतलं. तसेच सरकार स्थापन न झाल्यानं अजूनही शासकीय कापूस खरेदी केंद्र उघडले नाही आहेत. त्यामुळं व्यापारी कवडीमोल भावात कापसाला भाव देत आहेत. तसेच लवकरात लवकर शासनाने आर्थिक मदद जाहीर करावी अशी विनंती केली.
आज नागपूर मधील काटोल विधानसभा क्षेत्रातील ओल्या दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान चारगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. यावेळी सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही, कोणी पाहणी करायला आले नाही, पिकाला भाव नाही, अशा व्यथा हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मांडल्या. pic.twitter.com/svWXwGWudo
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 14, 2019