लोकशाहीची मूल्ये पायी तुडवणे सरकारने थांबवावे ; नाहीतर रस्त्यावर उतरू – शरद पवार

0
38
Sharad Pawar
Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | शासनाच्या अन्यायकारक व अनागोंदी कारभाराला कंटाळून मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नी सखूबाई यांना मुख्यमंत्र्यांच्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी कोठडीत डांबण्यात आले होते. या घटनेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार टिका केली आहे. लोकशाहीची मूल्ये पायी तुडवणे सरकारने थांबवावे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून मोठे जन अांदोलन उभे करू असा इशारा पवार यांनी दिला आहे.

भाजप सरकारने असंवेदनशीलतेची परिसीमा गाठली असून लोकशाहीची मूल्ये पायी तुडवून अघोषित आणीबाणी पुकारणाऱ्या या सरकारने हे वेळीच थांबवावे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून निर्वाणीचा लढा पुकारावा लागेल, असे सांगून पवार यांनी भाजपा वर जोरदार आगपाखड केली आहे.

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई आणि मुलगा नरेंद्र पाटील यांना ताब्यात घेतलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात नरेंद्र पाटील यांनी आक्रमक आंदोलन करु नये, यासाठी पोलिसांनी या दोघांना सकाळी सहा वाजल्यापासून पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं. सरकारच्या या कारवाईचा पवार यांनी निषेध नोंदवला आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले
शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here