भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशी आयोगासमोर शरद पवार राहणार हजर

sharad pawar saheb
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवण्यात आलेला असून त्यांच्याकडून चौकशीचे कामकाज सुरू आहे. दरम्यान, येत्या 23 आणि 24 फेब्रुवारीला आयोगाकडून साक्ष नोंदवण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे आयोगासमोर हजेर राहणार आहेत. तत्पूर्वी 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे कामकाज पुण्याऐवजी मुंबईत होणार आहे.

निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची चौकशी सध्या चौकशी सुरू आहे. तर या प्रकरणाचा एनआयच्यावतीने तपास केला जात आहे. दरम्यान यासाठी चौकशी आयोगाचे नेमणूक करण्यात आलेली असून आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी मुंबईत होणाऱ्या सुनावणी सत्रादरम्यान 4 एप्रिलला शरद पवार यांना साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचे समन्स जारी करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव पवार सुनावणीस हजर राहू शकले नव्हते.

दरम्यान, आता आयोगाने पुन्हा शरद पवार यांना हजर राहण्यास सांगितले असून पवारही त्या आयोगापुढे हजर राहणार आहेत. 1 जानेवारी 2018 मध्ये पुण्यातील कोरेगाव-भीमा या प्रकरणी मोठ्या प्रमाणात राज्यभरात दंगल उसळली होती. या दंगलीबाबत स्थानिक रहिवासी अनीता सावळे यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यासह अन्य काहीजणांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फौजदारी फिर्याद नोंदविली गेली आहे.