कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद सोडवण्यासाठी आता शरद पवार करणार मध्यस्थी ; गरज पडली तर मोदींनाही भेटणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मेट्रो कारशेड वरून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. या वादात केंद्रानेही उडी घेत कांजूरमार्ग येथे होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करत न्यायालयाचे दार ठोठावले आहे. परिणामी या प्रकरणाची गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा वाद शमण्याचे चिन्ह दिसत नसल्याने आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी मोठी भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

कांजूरमार्ग येथील कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. “शरद पवार कांजूरमार्ग कारशेड प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर ते एक किंवा दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील भेटतील. या मुद्द्यावर पवार मोदींशी चर्चा करतील,” अशी माहिती मलिक यांनी दिली. तसेच, मुंबईच्या विकासात अडथळा नको यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही प्रयत्न करत आहेत. या सर्वांत शरद पवार मद्यस्थी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस यांचा सरकारवर घणाघात –

तर, प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? 30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल, असे उत्तर ट्विटरच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment