हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाने थैमान घातलं असून त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय वाहतूकीवर झाला आहे. अनेक देशांनी आपल्या देशात येणाऱ्या विदेशातील अनेक फ्लाईट्स बंद करण्यात आल्या आहेत. यायचाच फटका उझबेकिस्तानमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या 39 भारतीयांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये विदेशातील अनेक फ्लाईट्स बंद करण्यात आल्यानं जवळपास 39 भारतीय नागरिक अडकून पडले आहेत.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सांगली, नाशिक आणि पुणे या ठिकाणचे रहिवाशी असलेले अनेक डॉक्टर्स नियोजित पर्यटन दौऱ्यासाठी 10 मार्च रोजी उझबेकीस्तान येथे गेले आहेत. मात्र, याच कालावधीत उझबेकिस्तानमध्ये आपल्या नियोजित दौऱ्यानुसार या महाराष्ट्रीयन नागरिकांनी उझबेकिस्तान गाठले होते. मात्र, त्यांचा परतीचा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे. त्यामध्ये बहुतांश डॉक्टरांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना पत्र लिहले आहे.
उझबेकिस्तानमध्ये अडकलेल्या या मराठी माणसांना रिटर्न्स फ्लाईट उपलब्ध नसून आपण भारतीय परराष्ट्र खात्याशी संपर्क साधा, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान याबाबतीची माहिती कळताच उझबेकिस्तान येथे अडकलेल्या या 39 मराठी जनांसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना पत्र लिहून या नागरिकांची देशवापसी करण्याची विनंती केली आहे. मात्र, आपण विदेशात अडकून पडल्याने त्यांना धास्ती लागली आहे. तर, या 39 नागरिकांचे कुटुंबीय त्यांच्या परतीच्या प्रवासाकडे डोळे लावून आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.