हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच पार पडलेल्या मंथन मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी गौप्यस्फोट केले आहेत. या गौप्यस्फोटांवर आता शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवारांनी बोललेल्या गोष्टी मला पहिल्यांदाच कळाल्या आहेत. त्यांची भूमिका आमच्या विचारांशी सुसंगत नव्हती. आमची भूमिका आजही भाजपच्या विरोधातच आहे. इतकेच नव्हे तर, पहाटेचा शपथविधी पक्षाचे धोरण नव्हते, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार काय म्हणाले होते?
शरद पवारांविषयी गौप्यस्फोट करत अजित पवार म्हणाले होते की, “भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती मी शरद पवार यांना दिली होती. शरद पवार यांनी मला बोलावून सांगितले, की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो.” अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शरद पवारांचा अजित पवारांच्या बंडामागे पूर्ण पाठिंबा होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता या सर्व प्रश्नांवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार काय म्हणाले?
अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांवर शरद पवार म्हणाले की, अजित पवारांनी बोललेल्या गोष्टी मला पहिल्यांदाच कळाल्या आहेत. त्यांची भूमिका आमच्या विचारांशी सुसंगत नव्हती. आमची भूमिका आजही भाजपच्या विरोधातच आहे. त्यावेळी मी कोणाला सांगून राजीनामा देईल अशी स्थिती नव्हती. मी राजीनामा देण्याचे कारण काय मी पक्षाचा अध्यक्ष होतो. माझ्या राजीनाम्याचा निर्णय सामूहिक झाला होता. अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा आग्रही विचार माझ्यासमोर मांडला होता. त्यावेळी कुणाला जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता असा सल्ला मी दिला होता.