हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market Holiday : उद्या 8 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे. यामुळे उद्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर कोणत्याही प्रकारचे ट्रेडिंग केले जाणार नाहीत. BSE वेबसाइटवरील माहितीनुसार, 8 नोव्हेंबर 2022 रोजी संपूर्ण सत्रासाठी BSE आणि NSE वरील ट्रेडिंग बंद राहतील.
शेअर बाजारातील सुट्ट्यांच्या लिस्टनुसार, मंगळवारी इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रेडिंग केले जाणार नाहीत. BSE आणि NSE वर या वर्षातील ही शेवटची सुट्टी असणार आहे. Share Market Holiday
इथे लक्षात घ्या कि, 8 नोव्हेंबर रोजी ट्रेडिंगच्या सकाळच्या सत्रासाठी (सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान) कमोडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) बंद राहतील. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये सायंकाळी 5 ते रात्री 11.30 या वेळेत ट्रेडिंग होईल. नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज लिमिटेड (NCDEX) वर उद्या दोन्ही सत्रांमध्ये ट्रेडिंग बंद राहणार आहेत. या कॅलेंडर वर्षातील ट्रेडिंग कॅलेंडरनुसार, व्यावसायिक सुट्ट्यांमुळे शेअर बाजार 13 दिवस बंद राहिला आहे. आता उद्याची सुट्टी ही 2022 मधील शेवटची सुट्टी असेल. Share Market Holiday
शनिवार-रविवारी कामकाज बंद
हे लक्षात घ्या कि, भारतीय शेअर बाजाराला शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्ट्या असतात. याशिवाय कोणतेही राष्ट्रीय सण असतील तरच ते बंद राहते. शेअर बाजारातील सुट्ट्यांची माहिती आल्याला BSE च्या वेबसाइटवरून कळू शकेल. Share Market Holiday
शेअर बाजारात आज उसळी
आज, सोमवार, 7 नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजार ग्रीन मार्कवर बंद झाले आहेत. आज BSE सेन्सेक्स 234.79 अंकांच्या वाढीसह 61,185.15 वर तर निफ्टी 50 देखील 85.60 अंकांच्या उसळीसह 18,202.80 वर बंद झाला. तसेच आज बँक निफ्टीने देखील 428.25 अंकांची उसळी घेऊन 41,686.70 वर बंद झाला. आज सेन्सेक्सने जोरदार सुरुवात केली मात्र आज उच्चांकावरून तो 400 पॉइंट्सने खाली आला. तसेच, बाजार बंद होईपर्यंत तो सावरला आणि वाढीने बंद झाला. Share Market Holiday
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/static/markets/marketinfo/listholi.aspx
हे पण वाचा :
HDFC Bank ने ग्राहकांना दिला धक्का !!! आता EMI साठी मोजावे लागणार जास्त पैसे
Redmi Clearance Sale : फक्त 4,499 रुपयांमध्ये घरी आणा Redmi चा ‘हा’ पॉवरफुल फोन
Multibagger Stock : सॉक्स बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 3 पट नफा !!!
Bandhan Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!!! FD वर मिळणार 8% पर्यंत व्याज
Aadhar Card मधील माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या