नवी दिल्ली । आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार ग्रीन मार्कवर वाढीसह उघडला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE सेन्सेक्स 220 अंकांनी किंवा 0.37 टक्क्यांनी वाढून 59255 पातळीवर उघडला. तर दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात NSE च्या निफ्टीने 77 अंकांच्या किंवा 0.43 टक्क्यांच्या उसळीसह 17716 च्या पातळीवर ट्रेड सुरू केला. ट्रेडिंगच्या शेवटी, सेन्सेक्स 412.23 अंकांच्या किंवा 0.70 टक्क्यांच्या वाढीसह 59,447.18 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 144.80 अंकांच्या किंवा 0.82 टक्क्यांच्या वाढीसह 17,784.35 वर बंद झाला.
शेअर बाजार गुरुवारी रेड मार्कवर बंद झाला
याआधी गुरुवारी, सेन्सेक्स ट्रेडिंगच्या शेवटी 575.46 अंकांनी किंवा 0.97 टक्क्यांनी घसरून 59,034.95 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 168.10 अंकांनी किंवा 0.94 टक्क्यांनी घसरून 17640 च्या पातळीवर बंद झाला.
RBI MPC बैठक: रेपो दरात कोणताही बदल नाही
रिझर्व्ह बँकेने चलनविषयक धोरण समितीचे निकाल शुक्रवारी जाहीर केले. आर्थिक सुधारणांना प्राधान्य देत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. दास म्हणाले,”सध्या आम्ही रेपो दर 4 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. यामुळे पतपुरवठ्यात वाढ होऊन अर्थव्यवस्थेला महामारीच्या दबावातून बाहेर काढण्यास मदत होईल. RBI ने रेपो दरात कोणताही बदल न करण्याची ही 11वी वेळ आहे.” गव्हर्नर म्हणतात की,” अर्थव्यवस्था अद्याप महामारीतून पूर्णपणे बाहेर आली नाही. अशा परिस्थितीत आर्थिक स्थैर्य राखणे हे आमचे प्राधान्य आहे.”
RBI च्या अंदाजानुसार, CPI महागाई या आर्थिक वर्षात 5.7% वर राहू शकते
RBI ने आर्थिक वर्ष 2023 साठी महागाईचा अंदाज 4.7 टक्क्यांवरून 5.7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. या आर्थिक वर्षासाठीच्या आर्थिक धोरण समितीच्या पहिल्या बैठकीनंतर दास यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. दास म्हणाले की, RBI ला FY2023 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई दर 5.7 टक्के असेल अशी अपेक्षा आहे.