सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सतत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शशिकांत शिंदे यांनी म्हंटले आहे कि, नाना पटोले यांच्याकडून सध्या आरोप केले जात आहेत. त्यांच्याकडून शत्रूंवर आरोप करायचे सोडून मित्रांवर आरोप केले जात आहेत. हे कितपत योग्य आहे. पाळत ठेवली जात असेल तर पटोले यांनी त्यांच्या नेत्यांशी अंतर्गत चर्चा करायला हवी.अशा गोष्टींची जाहीर वाच्यता करणे कितपत योग्य आहे?, असा सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी नाना पटोले यांना विचारला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणी चांगलेच संतापले असून त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे. नाना पटोले यांच्या अशा आरोपांमुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची अजित पवार यांनी म्हंटल. नाना पटोलेंची भूमिका महाविकास आघाडीला अडचणीत आणणारी आहे, असं अजित पवारांचं म्हणणं आहे.