शेगाव | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. स्वत:ला स्मशानभूमीतील खड्ड्यांत गाढून घेत आंदोलक शेतकर्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले.
बुधवारी सकाळी शेगाव जवळील संग्रामपुर तालुक्यातील निरोड येथील स्मशानभूमीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी आंदोलकांनी सरकारकडे केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकर्यांच्या प्रश्नांना घेऊन नेहमी आंदोलन करत असते. मात्र शेगाव येथील सदर आंदोलनात कार्यकर्त्यांनी स्वत:ला जमिनीत गाढून घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन केल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.
इतर महत्वाचे –
म्हणून मी पेरु समाधीवर ठेवला आणि दर्शन घेतले – पंकजा मुंडे
भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण – सुमित्रा महाजन
इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि असे हटके व विशेष लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.