हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे नाराज असून संघटनेत उभी फूट पडल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. अशातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी याबाबत प्रतिक्रिया देत असताना राजू शेट्टींवर (Raju Shetti) जोरदार निशाणा साधला. राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, अशी टीका खोत यांनी केली आहे. आज बुलडाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना सदाभाऊंनी राजू शेट्टींवर निशाणा साधला .
मला वाटतं शेट्टी यांची संघटना एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. एखाद्या कंपनीत जसं कर्मचाऱ्याचे चूक झाली की त्याला काढलं जातं नोटीस दाखवली जाते. त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांना वागणूक द्यायला लागली आहे. मला वाटतं जो स्वाभिमानी असतो तो कंपनीत काम करत नसतो तर तो स्वतःचा विश्व स्थापन करत असतो तो कोणाच्याही नोटीशीवर जगत नाही. त्यामुळे मला वाटतं रविकांत तुपकर मी बघितलेला स्वाभिमानी आहे. तो त्याला देण्यात आलेल्या नोटिसा पायदळी तुडवित पुढे जाईल.” असे माध्यामांशी संवाद साधताना खोत यांना म्हणलं आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील उभ्या फुटीच्या चर्चा सुरु झाल्यानंतर सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात टीका टिपणी होताना दिसत आहे. नुकताच “स्वाभिमानी आता शिल्लकच राहिली नाही, त्यामुळे गटतट काय होणार? राजू शेट्टी यांना अनेक सहकारी सोडून गेले आहेत, त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही समिती बेशिस्त समिती आहे. त्यामुळे ही समिती तुपकर यांच्यावर कारवाई करू शकणार नाही. तुपकर यांचा बळी घेतला जात आहे.” असा आरोप खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत यांच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या या टीकेनंतर राजू शेट्टी आता काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. तसेच आगामी काळात रविकांत तुपकर काय भूमिका घेतात याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे.