वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे देण्यात आले संघाचे कर्णधारपद

Team India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी (West Indies tour) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी (West Indies tour) भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आले आहे. तर रविंद्र जडेजाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत वेस्ट इंडिजचा दौरा (West Indies tour) करणार आहे. याठिकाणी तीन एकदिवसीय सामनेसुद्धा होणार आहे. या सीरिजसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

याआधी विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यावर रोहित शर्माला कर्णधार बनविण्यात आले. तर केएल राहुल, ऋषध पंत, हार्दिक पांड्या यांनीदेखील भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. तर रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्यावर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्यात आले होते. आता शिखर धवनच्या रूपाने टीम इंडियाला 7 वा कॅप्टन मिळाला आहे. यावर्षी टीम इंडियाने 8 महिन्यांमध्ये 7 जणांकडे टीम इंडियाचे कर्णधारपद दिले आहे.

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरील (West Indies tour) एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह

दरम्यान, आता फक्त एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा नंतर होणार आहे. आगामी काळात टी-20 विश्वकप स्पर्धा होणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या (West Indies tour) पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो.

भारत – वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक
पहिली वनडे – 22 जुलै
दुसरी वनडे – 24 जुलै
तिसरी वनडे – 27 जुलै

टी- 20 सामन्याचे वेळापत्रक
पहिला टी-20 – 29 जुलै
दुसरा टी-20 – 1 ऑगस्ट
तिसरा टी-20 – 2 ऑगस्ट
चौथा टी-20 – 6 ऑगस्ट
पांचवा टी-20 – 7 ऑगस्ट

हे पण वाचा :
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

Credit Card द्वारे खरेदी करताना कोणत्या गोष्टींचे बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करता येत नाही ते जाणून घ्या

माझ्यामुळं शिंदेंना विधानसभेत उमेदवारी मिळाली, ते आयुष्यातील मोठं पाप – विनायक राऊत

Bank of Baroda ने चेक पेमेंटच्या नियमांमध्ये केले महत्वाचे बदल !!!

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ विश्वासू शिवसैनिकाकडून फडणवीसांचे अभिनंदन ; नागपूरात घडलं असं काही की…