मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात!! शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले असून अजूनही सरकारकडून संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीकेची झोड उठवली जात आहे. येव्हडच नव्हे तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा प्रश्न राज्यातील जनतेला सुद्धा पडलाय. याच दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. येत्या आठवड्यात हा विस्तार होण्याची शक्यता आहे. तसेच काही मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल सुद्धा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली तसेच कोणाला किती खाती मिळणार? पालकमंत्री कोण कोण असतील याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार, पुढील आठवडयात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडेल. तसेच शिंदे फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळात महिलांचाही समावेश होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तारास दुजोरा दिला आहे.

शिंदेंच्या शिवसेनेतून मंत्रिपदाची संभाव्य नावे काय ?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून कोणकोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. यामध्ये संजय शिरसाठ, सदा सरवणकर, भरत गोगवले, प्रताप सरनाईक, चिमन आबा पाटील, बच्चू कडू, यामिनी जाधव, अनिल बाबर या आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. कोणाला मंत्री करायचे याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील.