व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

“ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं”; शिंदे- फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातबाजीमुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडल्याचे आपण बघितलं. यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतल्यानंतर राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार कोसळणार तर नाही ना? अशाही चर्चा सुरु झाल्या. विरोधकांनीही यावरून सरकारवर निशाणा साधला. मात्र आमची जोडी कधी तुटणार नाही, “ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं” असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

आज ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत पालघर येथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. जाहिरातबाजीनंतर आज प्रथमच मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री एका व्यासपीठावर दिसले. त्यामुळे दोन्ही नेते नेमकं काय म्हणणार? भाजप- शिवसेनेतील वाढत झालेल्या दरीबद्दल काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष्य होते. अखेर दोन्ही नेत्यानी आपापल्या भाषणात यावर भाष्य करत विरोधकांना चांगलंच फटकारले आहे. आमचे सरकार अतिशय मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात सध्या सुरु असलेल्या चर्चांवर आणि युतीच्या भविष्याबाबत भाष्य केलं. आमचा एकत्रित प्रवास हा 25 वर्षाचा आहे आणि आता ते घट्ट झालं आहे. त्यामुळे एका जाहिरातीमुळे आमच्यात दुरावा येणार नाही. जाहिरातीने पडावं एवढं आमचं सरकार तकलागू नाही, ते तुमच्या सरकारसारखं नाही. आमचं सरकारं महाविकास आघाडीपेक्षा मजबूत आणि घट्ट आहे असं म्हणत फडणवीसांनी विरोधनकांना प्रत्युत्तर दिले.