Tuesday, January 31, 2023

शिंदे गटाला केंद्रातही 2 मंत्रीपदे?? या नावांची चर्चा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सत्तास्थापन केल्यांनतर दोन्ही बाजूच्या एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आमदारांसोबत शिवसेनेतील एकूण 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता यातील 2 खासदारांना केंद्रातील सरकार मध्ये 2 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जेडीयूने भाजपची साथ सोडल्यानंतर आता शिंदे गट हाच एनडीए मधील भाजपचा मोठा सहकारी आहे. येत्या काही दिवसात मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. यामध्ये शिंदे गटातील दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे आणि विदर्भातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाचे मनोबल वाढवण्यासाठी किंवा उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपकडून शिंदे गटाला 2 मंत्रीपदे मिळू शकतात.

- Advertisement -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आणि 12 खासदार यांच्यासह शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची हा मोठा झटका होता. शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात असून पुढील सुनावणी 22 ऑगस्टला होणार आहे. आमदारांवरील अपात्रतेची कारवाई , तसेच शिवसेना नक्की कोणाची? ठाकरेंची की शिंदेंची याबाबतचा फैसला आता कोर्टातच होईल.