शिर्डी : हॅलो महाराष्ट्र – 25 जून रोजी शिर्डी जवळील को-हाळे गावात एका वृद्ध दांपत्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे एका क्लूच्या आधारावर पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. हे हत्याकांड घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या चारच दिवसांत या हत्येचा उलगडा केला. राहाता तालुक्यातील को-हाळे गावात 25 जून रोजी वृद्ध पती-पत्नीची हत्या करण्यात आली होती. शशिकांत यांचे वय 55 वर्ष तर सिंधूबाई यांचे वय 50 वर्ष होते. हे दोघे पती पत्नी रात्री झोपेत असताना त्यांची हत्या करण्यात आली.
हि हत्या कौटुंबिक कलहातून झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु केला होता. शशिकांत यांचे त्याच्या भावाशी शेतीचे वाद सुरु होते.त्यामुळे त्याचा या हत्याकांडात सहभाग आहे का ? या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला होता. पण हि हत्या अट्टल दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने असल्याचे आता समोर आले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. शेतीच्या वादाच्या कारणाव्यक्तिरिक्त सदरचा गुन्हा हा इतर कोणत्या कारणामुळे घडला आहे का? याचा तपास पोलिसांनी सुरु केला होता.
याचा तपास सुरु असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून हा गुन्हा कोणी केला याची खात्रीशीर माहिती मिळाली. याच्या आधारे पोलिसांनी देवेन्द्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले, दिलीप भोसले आणी आवेल भोसले या तिघांना अटक केली आहे. हा हल्ला दरोड्याच्या उद्देशाने झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हत्या करण्याच्या पद्धतीवरून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींच्या मित्रांनी अशाच प्रकारे जिल्ह्यात या अगोदरदेखील हत्या केली आहे. यामुळे पोलिसांना हत्या करण्याच्या पद्धतीवरून या हत्याकांडाचा छडा लावण्यात यश आले आहे.