अहमदनगर प्रतिनिधी । शिर्डी जवळच्या लोणी गावात शाब्दिक चकमकीतून झालेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला. आर्थिक देवाण घेवाण मधून घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. घटनास्थळावरुन गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी गावातील हॉटेल साई छञपती मध्ये रात्रीच्या वेळी शाब्दिक वादातून फरदीन अब्बू कुरेशीला या इसमाला बंदुकीतुन चार ते पाच जणांनी गोळी मारून ठार केले.
या घटनेनंतर सर्वआरोपी फरार झाले. दरम्यान मृतक फरदीन कुरेशीच्या आईने लोणी पोलिसात खुनाबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भादवी कलम ३०२ चा गुन्हा आरोपींविरोधात दाखल केला गेला आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास लोणी पोलीस करत आहेत.