कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शिरवडे (ता. कराड) येथे माझी सर्व शेती आहे. सदरची शेतजमिन ही माझी कायदेशीर मालकी व वहिवाटीची असून त्यामध्ये इतर कोणत्याही इसमाचा काडीमात्रही संबंध नाही. सदर शेतजमिनीमध्ये पिड्यानिपिड्या आमची वहिवाट असून गावातील काही राजकीय पुढारी मला मानसिक त्रास देत आहेत. राजकीय दबाव टाकून माझ्याकडुन बळजबरीने रस्त्यासाठी जमिन मागत आहेत. तळबीड पोलिसासमोर 5 फूट जागा दे, अन्यथा पोलिस केस करण्याची धमकी दिली. तेव्हा मला योग्य न्याय न मिळाल्यास मी आत्मदहन करणार असल्याचे गजेंद्र जगदाळे यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन कराड उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मी गजेंद्र साहेबराव जगदाळे शिरवडे गावचा एक सामान्य शेतकरी असून शिरवडे गावच्या हददीमध्ये माझी सर्व शेती आहे. सदरची शेतजमिन ही माझी कायदेशीर मालकी व वहिवाटीची आहे. त्यामध्ये इतर कोणत्याही इसमाचा काडीमात्रही संबंध नाही. सदर शेत जमिनीमध्ये पिड्यानिपिड्या आमची वहिवाट असून गावातील काही पुढारी मला मानसिक त्रास देत आहेत. दबावापोटी माझ्याकडुन बळजबरीने रस्त्यासाठी जमिन मागत आहेत. तरीही माझी आपणास विनंती आहे, की कायदेशीरपणे गावातील नकाशाप्रमाणे रस्ता व्हावा.
शिरवडे- मसूर ग्रामीण मार्ग क्रं. 318 हा गेल्या तीन महिन्यापासुन एका शेतकऱ्याने हेतु परस्पर बंद केलेला आहे. हा रस्ता पुर्णता त्याच शेतकऱ्याच्या गट / सर्व नंबर 318 मधुनच जात आहे. असे भुमी अभिलेख दप्तरी असलेल्या नकाशावरती दर्शविलेला आहे. गावचे सरपंच अनिल रामचंद्रं जगदाळे यांनी मला काल दि. 16/11/2022 रोजी सांयकाळी 5.30 वाजता फोन करुन तळबीड पोलीस स्टेशन येथे बोलावले होते. त्यानंतर लगेच थोड्या वेळाने पोलीस स्टेशन मधुन हवालदाराचा फोन आला की तुम्ही पोलीस स्टेशनला या. तदनंतर मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथे सरपंचानी पोलीसाच्या समोर माझ्यावर दबाव टाकण्यात आला.
सरपंच म्हणाले, तुझ्या शेतातील रस्त्यासाठी 5 फुट प्रमाणे जागा दे, अन्यथा तुझ्यावरही पोलीस केस होईल. आपल्यावर दबाव आणून सरपंच आपल्यावर अन्याय करत आहेत. त्यामुळे माझे मानसिक संतुलन बिगडत आहे. माझ्या डोक्यामध्ये आत्महत्या करण्याचे विचार येवु लागले आहेत. जर माझ्या जिवाचे बरे वाईट झाले. तर याला पुर्णपणे गावचे सरपंच अनिल रामचंद्रं जगदाळे हे सर्वस्वी जबाबदार राहणार आहेत. माझ्यावर दबाव टाकल्याबददल सरपंचावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी विनंती शेतकरी गजेंद्र साहेबराव जगदाळे यांनी निवदेनात केली आहे.