हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यसरकारला चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज राज्य सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. “आम्हाला कोणाचे देणंघेणं नाही, महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. 25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणारच. 100 खोके घालूनही सरकार येऊ देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
राजू शेट्टी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डांगळे. ते म्हणाले की, अमी ऊस परिषद साखर संकुलावर मोर्चा काढला. आणि दोन दिवस ऊसतोड बंदही ठेवली. तरीसुद्धा सरकारने प्रलंबित निर्णय घेतला नाही, त्यामुळे आता आम्ही चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वाभिमानी संघटनेकडून 25 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रोखून राज्यमार्गावरही आंदोलन केले जाणार आहे. पुणे-बंगळूर महामार्ग आणि अनेक राज्यमार्ग, जिल्हा मार्ग बंद ठेवला जाणार आहे. आम्ही चक्काजामच्या माध्यमातून मंत्र्यांना आता मैदानातच जाब विचारला जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.