हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर इतर नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. पटोलेंच्या स्वबळाच्या विधानावर खासदार संजय राऊत यांनी पटोलेना महत्वाचा सल्लाही दिला होता. आज मात्र, खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून पटोलेंवर निशाणा साधत टोला लगावला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखात हंटले आहे कि, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बोलण्यावर राज्यातील आघाडी सरकारच भवितव्य अवलंबून आहे असे जर वाटत असेल तर ते चुकीचे आहे. नानांच्या बोलण्यावर आघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून नाही. मोकळ्या स्वभावाचे नाना पटोले आहेत. ते अधून मधून त्यांची मन की बात व्यक्त करतात. नाना अगोदर भाजपमध्ये होते.
मोदी याना चार गोष्टी सांगून त्यांनी पक्षत्याग केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यात कोणत्याही परिस्थितीत आता काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचेच असा विडा त्यांनी उचलत त्या दृष्टीने प्रयत्नही त्यांनी केला. त्यांच्या हिमतीस दाद द्यावीच लागेल. नानांच्या बोलण्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? काँग्रेसला तसं बळ मिळालं असेल तर ते बरेच आहे,’ असेही शिवसेनेने सामनातील अग्रलेखातून म्हंटले आहे.