शिवसेनेला पाहिजे केंद्रात ‘हे’ पद ; त्या वरून सेना भाजपमध्ये पुन्हा धुसपूस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | सेना भाजपमध्ये पुन्हा एकदा मानपानावरून शीतयुद्ध रंगात आले आहे. लोकसभेचे उपाध्यक्ष पद शिवसेनेला हवे आहे. तर भाजपला ते एनडीएचा घटक नसलेल्या पक्षाला द्यायचे आहे. त्यामुळे शिवसेना भाजप यांच्यात दुसपूस वाढली आहे.

शिवसेनेने या आधीदेखील लोकसभा उपाध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. तर भाजप हे पद आयएसआर काँग्रेसला देण्याच्या पवित्र्यात आहे. मात्र आयएसआर काँग्रेस हे पद घेण्याच्या तयारीत नाही. कारण भाजपने आधी आमच्या आटी मान्य कराव्यात आणि त्यानंतर आम्ही हे पद स्वीकारतो असे आयएसआर काँग्रेसने म्हणले आहे. तर आयएसआर काँग्रेसच्या या पवित्र्यावर शिवसेना चिडली असून भाजप त्यांना पद घ्यायचे नाही तरी का एवढी मागे लागते आहे असे असे म्हणले आहे.

दरम्यान भाजपने हे पद जर शिवसेनेला दिले तर त्या पदावर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. कारण भावना गवळी या ४ वेळा लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांना संसदीय कामकाजाचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे त्यांना या पदी नेमले जाऊ शकते. तसेच भावना गवळी यांना मंत्री केले जाईल अशी चर्चा असताना त्यांच्या ऐवजी शिवसेनेने अरविंद सावंत यांची त्या पदी नेमणूक करण्याची शिफारस उद्धव ठाकरेंनी केली. त्यामुळे भावना गवळी यांची मंत्री पदाची संधी हुकली.

Leave a Comment