व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आरोपावेळी स्वतःच्या बायकोचीही मुख्यमंत्र्यांनी बाजू घेतली नाही, नवरदेव आहात ना…; किरीट सोमय्यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे या लबाडी करू शकत नाहीत. पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी लबाडी करत आहेत, असा आरोप भाजपचे माझी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा सोमय्या यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांवर व शिवसेना, संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ‘आपल्या बायकोवर आरोप झाले कि तिची आपण बाजू घेतो. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बायकोवर जेव्हा जेव्हा आरोप झाले तेव्हा तिची बाजू का घेतली नाही, नवरदेव आहात ना…, असे म्हणत सोमय्या यांनी टीका केली.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणी आज दिल्लीत केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सोमय्यांनी हटके स्टाईलमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना सोमय्या म्हणाले की, “ज्या ज्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बायकोवर आरोप झाले. त्या त्या वेळी त्यांनी आपल्या बायकोची बाजू घ्याला पाहिजे होती. मात्र त्यांनी आपल्या बायकोची बजावू का नाही घेतली, अशी टीका सोमय्या यांनी केला.

यावेळी सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. “संजय राऊत यांनी जेव्हा जेव्हा ट्विट केले कि महाराष्ट्र हसतो. गेली साडेचार महिने संजय राऊत यांच्याकडून माझी आई गुणवंती सोमय्या नंतर पत्नी मेधा सोमय्या, मजहा मुलगा निल सोमय्या असा माझ्या सात पिढ्यांचा उध्दार संजय राऊतांनी केला आहे. काय शिव्या देतायत राऊत. कालपण अशीच त्यांनी शिवी दिली. आता बिचारे थकले आहेत हो राऊत, असे म्हणत सोमय्यानी राऊतांना टोला लगावला.

अगोदर नमस्कार करायचे आता आदाब करतायत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना व संजय राऊत दररोज सकाळी लवकर उठून हात जोडून प्रणाम करायचे आता ते खाली वाकून आदाब करत आहेत. याला काय म्हणायचे, अशी टीका सोमय्या यांनी शिवसेनेवर केली आहे.