बुद्धीचा अन् प्लास्टिक सर्जरीचा दूरदूरपर्यंत संबंध नसतो; शिवसेनेचा अमृता फडणवीसांवर निशाणा

0
65
Shiv Sena Amrita Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मशिदीवरील भोंग्यावरून महाराष्ट्रातील राजकारण आता चांगलेच तापले असताना उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुकही केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ट्विट करीत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्यांवरून आता शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी फेसबुकच्या माध्यमातून मिसेस फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

अंबादास दानवे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून तीन फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यामध्ये “योगी कडून आम्हाला काही शिकण्याची गरज नाही. मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे आहेत. म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेला नद्यामध्ये हे चित्र दिसते नाही.

https://www.facebook.com/iambadasdanve/posts/543403810477010

मराठी भैया काल सकाळीच उठून ज्याना आजपर्यंत शिव्या देत होते त्यांचा छोट का ना होईना कौतूक करत होते हे विशेष असो. आम्हाला शिक्षण, आरोग्य, रोजगारावर राजकारण करणारे द्रष्टे इजकारणी आम्हास लाभो, हीच प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना… जय श्री राम ! आणि अजून एक बुद्धीचा अन प्लास्टिक सर्जरीचा दूरदूर पर्यंत संबंध नसतो हे आज पुन्हा एकदा दिसून आले.” असे लिहीत शेवटी मुख्यमंत्री आमचा अभिमान असा हॅश टॅग देत दानवे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.

अमृता फडणवीसांनी काय केले होते ट्विट?

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. “ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से!” असे म्हणत त्यांना उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता खोचक टोला लगावला होता. तसेच Maharashtra आणि thursdayvibes हे हॅशटॅग देखील वापरले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here