हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते नारायण राणे यांच्यावर शिवसेनेने कारवाई केली. यानंतर राणेंना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आल्यानंतर केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी नुकताच फोनवरुन नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला होता. या राजकीय घडामोडीत शिवसेना खासदार संजय राऊत हे मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी राणेंना टोला लगावला. “एक मंत्री म्हणजे मंत्रिमंडळ नाही तसेच विरोधकांवरही निशाणा साधला. “ज्यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यावर टीका केली तेव्हा काय झोपला होता का?”, असा सवालही राऊतांनी केला.
केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांना फोन केल्यानंतर भाजपच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत तातडीने मुंबईत दाखल झाले. यावेळी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी राणेंवरही निशाणा साधला. आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या पदावर पोहचवले. त्यामुळे त्यांचे उपकार हे अजूनही मानले पाहिजेत.
संजय राऊत गुरुवारी मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. नारायण र्राणेंच्या टीकेला राऊतांनी आपल्या शैलीत टोला लगावलेला आहे. राणेंना टोला लगावताना ते म्हणाले की, एक मंत्री म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळ नाही हि गोष्ट प्रत्येकानी लक्षात घ्यावी.
दरम्यान, काल कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांनी ‘सामना’तील अग्रलेखावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. राऊत हे संपादक पदाच्या लायकीचे नाहीत. ते फक्त उद्धव ठाकरे खूश व्हावे इतकंच लिहितात. मी त्यांना 17 तारखेनंतर उत्तर देईन’, असा इशाराही राणे यांनी पत्रकार परिषदेवेळी राऊतांना दिला होता.