हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर महाविकास आघाडी सरकारमधील इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करावी, असेही सल्ले त्यांना दिले जात आहेत. दरम्यान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी खडे बोल सुनावल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पटोले यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
नाना पटोले यांच्या वक्त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटल आहे कि, पटोले तुम्ही माझ्यावर पाळत ठेवली जात आहे असे बोललात. याचे तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नये. कारण प्रत्येक महत्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल हा राज्य सरकारकडे जातो. तुम्हीही राज्यातील महत्वाचे व्यक्ती आहात. त्यामुळे गांभीर्याने घेऊ नये, असा सल्ला राऊतांनी पटोले यांना दिला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्त्यव्याबद्दल आज माध्यमांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आज महाराष्ट्राच्या राजकारणात नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नानांनी या विषयाचं फार गांभीर्याने घेऊ नये. आम्ही सुद्धा घेत नाही, असे शेवटी राऊत यांनी म्हटले आहे.