भाजप ठाकरे सरकारचा ‘बाल बाका’ करू शकणार नाही ; संजय राऊतांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडली जात असल्याचीही अफवा भाजपकडून पसरवली जात आहे. याबाबत आज पुणे येथे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. “पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची वेळ आली आहे. आता भाजपने सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने पाहणे सोडून द्यावे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यावी कि 2024 मधेही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणार आहे. त्यामुळे भाजपही ठाकरे सरकारचा बाल बाका करू शकणार नाही. शिवसेना आग आहे. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका,” अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यातील भागांचा दौरा केला. दरम्यान, त्यांनी पुण्यात आपलं कोणी ऐकत नाही अजित पवारही मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. त्यांना सांगू आमचेही ऐका. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या आपल्यालाही दिल्लीवर राज्य करायचं आहे. पुण्यातही भगवा फडकवायचा आहे.

भाजपने एक गोष्ट लक्षात घ्यावी की, संपूर्ण देशाला परिवर्तनाची अपेक्षा आहे. शिवसेनेनेही परिवर्तन घटवलं आहे, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले. चंद्रकांत पाटील तुमची किंमत मी सव्वा रुपया केली. मात्र तुम्हाला माझी किंमत करता येणार नाही. मी एक शिवसैनिक आहे. माझ्यावर दावा दाखल करण्यापूर्वी लक्षात घ्यावे कि मी कधीच कोणता दावा हरलेली नाही. या ठाकरे सरकारला आव्हान देण्यासाठी हे ठोकरे सरकार आहे, असेहि राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, शिवसेना आग आहे…

पुणे येथील कार्यक्रमावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. त्यांना अटक केली ना. जेवणाच्या ताटावरून उठवलं ना. अजून किती, कुठे उठवायचे आहे ते सांगा. शिवसेना आग आहे. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, असा इशारा यावेळी राऊतांनी दिला.