शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी दिला ‘हा’ सूचक इशारा; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार आहेत. त्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत सूचक इशारा दिला. “दोन वर्षापासून गुजरातमध्ये 25 हजार कोटीचा झालेला घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. कोण होते हे लोक? सौ सोनार की एक लोहार की आज करणार आहोत,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षासाठी यंत्रणा नाही. गुजरातमध्ये 25 हजार कोटीचा घोटाळा झाला आहे. हा देशातील सर्वात मोठा बँक फ्रॉड आहे. आता ईडी तिथे काय करते ते पाहायचे आहे. त्या ठिकाणी ईडी का जात नाही? दोन वर्षापासून हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. कोण होते हे लोक? घोटाळा दाबण्यासाठी कुणीकुणी प्रयत्न केले? आरोपी कसे पळाले? हा संशोधनाचा विषय आहे.

 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित ठिकाणांवर आज छापेमारी सुरू आहे. त्याबाबत राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आज ईडीच्या वतीने टाकण्यात आलेल्या छाप्या संदर्भात माझ्याकडे माहिती नाही. राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील, काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य केले पाहिजे. दाऊदवर काही बोलू नये. काही कारवाई सुरू असेल तर राज्य आणि केंद्राने एकत्रित कामे केलं पाहिजे, असे यांनी म्हंटले.

Leave a Comment