हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घटना दुरुस्ती विधेयकावरूनआता मोदी सरकारवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घटना दुरुस्ती व भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरून भाजपला टोला लगावलेला आहे. त्रस्त झालेली जनता, लोक 2024 च्या निवडणुकीत आशीर्वाद देईल, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आज निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, जनता कुणाला आशिर्वाद देतेय हे कुठे दिसत नाही. अजूनही शेतकरी, जनता त्रस्त आहे. हि जनता, शेतकरी कुणाला आशीर्वाद देतेय हे शक्यच नाही. हि जनता खूप त्रस्त झाली आहे. हि जनता 2024 च्या निवडणुकीची वाट पाहतेय. ती तेव्हा त्या निवडणुकीत कुणाला आशीर्वाद द्यायचा असेल ते देईल.
आरक्षणाची मर्यादा 50 टक्केच्या वर वाढवता येणार नाही अशा प्रकारचा जो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्याच्यामुळे राज्यांना अधिकार मिळूनही त्याच्यावर आरक्षण राज्य देऊ शकेल कि नाही, यात शंका आहे. पण आम्हाला खात्री आहे कि, जो महाराष्ट्रातील मराठा समाजाचा जो रेटा आहे. त्याचमुळे सरकारला यातून मार्ग काढावा लागे. परंतु आम्हाला केंद्राने जो डब्बा दिला आहे. तो सध्या रिकामा आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.