हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील नेत्यांवर भाजपमधील नेत्यांकडून अनेकवेळा एकेरी नावाचा उल्लेख करून टीका केली जाते. नुकतीच अभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी नावाने टीका केली. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांवर घणाघाती टीका केली आहे. “कुठे हिमालय आणि कुठे टेकाड, टेंगूळ? असे राऊत यांनी म्हंटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाच्या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. राऊत यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील तुम्ही शरद पवारांचा एकेरी उल्लेख करता. कुठे हिमालय आणि कुठे टेकाड, टेंगूळ? पाटलांना अशा प्रकारे बोलणे शोभते का? तुम्हाला बोलायचेच आहे तर अतिरेक्यांसदर्भात बोला. त्यांना दम द्यावा. मात्र, तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नये, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचे आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिले नाही. सगले आयुष्य गेले पण कधी 60 वर तो गेला नाही, असे पाटील यांनी म्हंटले होते.