महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्नचाच बोलबाला – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुणे येथे महत्वपूर्ण विधान केले. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक पॅटर्न होऊन गेले असले तरी सध्या महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्नचाच बोलबाला आहे. ठाकरे व पवार हे एकत्र आले तर काय होऊ शकते हे महाराष्ट्राने पाहिले आहे, असे महत्वपूर्ण विधान शिवसेना खासदार राऊत यांनी केले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून आज पुणे जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. पुणे दौऱ्यात सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आगामी पिंपरी चिंचवड, पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दौरा करीत आहोत. या ठिकाणी शिवसेनेचाच महापौर होणार आहे. हि निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना पक्ष हे दोन मोठे पक्ष व त्यातील मोठे लोक एकत्रित आले तर काय होईल हे महाराष्ट्राने पाहिले आहे. सध्या महाराष्ट्रात पवार ठाकरे या पॅटर्नचाच बोलबाला आहे. हा पॅटर्न एकचलनी आहे.

यावेळी राऊत यांनी फडणवीस यांनाही टोला लगावला. ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहत आहेत. कधी कधी लोकांना वाटते कि अजूनही यौवनात मी. अनेकांना वाटते कि मला मुख्यमंत्री व्हावे. आम्हालाही दिल्लीत गेल्यावर वाटते कि आमचाच प्रधानमंत्री होणार. फडणवीस जी काही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहत आहेत. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांचे अख्खे आयुष्य स्वप्न बघण्यात जातो, असा टोला यावेळी राऊत यांनी लगावला.

सत्ता स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. केंद्रामध्ये सरकार असलेल्या पार्टीबरोबरच सत्ता स्थापन करण्याला शरद पवार यांनी प्राधान्य दिले असते. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला हे काय म्हणतात. त्याचे काय अर्थ होतात हे कळतं, असा टोला पाटील यांनी लगावला.

Leave a Comment