आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही, मुख्यमंत्री अजून सक्षम; राऊतांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच भाजपकडून महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला गेला आहे. दरम्यान, आज होणाऱ्या अधिवेशनात विरोधकांकडून गोंधळ घातला जाणार आहे. अशात काल चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून टोला लगावला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील याच्यावर निशाणा साधला. “आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही, तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजून सक्षम आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ व्यवस्थितपणे काम करत आहे. आपल्याला विरोधी पक्षाचे काम दिले आहे ते करावे, असा सल्ला राऊतांनी दिला.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज होणाऱ्या अधिवेशनात विरोधकांकडून गोंधळ घातला जाणार आहे. केंद्र सरकारने ओमिक्रॉनसंदर्भात सूचना दिल्या आहेत. केंद्रांच्या सूचनाप्रमाणे अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात आला आहे. विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

यावेळी राऊत यांनी सत्ताबदलाचा सूचक इशाराही दिला. ते म्हणाले की, भाजपच्या कार्यालयातून ईडीची सूत्र हालत असतील तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्रास होणार हे गृहीत धरले आहे. जया बच्चन यांची सूनबाई आणि लेकासंदर्भात वाचलं आहे. जे सरकारला प्रश्न विचारतील त्यांना त्रास दिला जाईल हे 2024 पर्यंत सुरु राहील. मात्र, 2024 पासून उलटी गंगा वाहयला सुरुवात होईल, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.

Leave a Comment