हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारवर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. तसेच ड्रग्ज प्रकरणावरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजपला टार्गेट केले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस व भाजपवर हल्लाबोल केला. राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजप राजकारण करत आहे. कोण चिखलफेक करत आहे. हे राज्याच्या जनतेला चांगले माहिती आहे, अशी टीका राऊत यांनी फडणवीसांवर केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, भाजप नेते सध्या चिखलफेक करत आहेत. चिखलात कोण लोळतंय, चिखलात लोळायला कुणी सुरुवात केली हे महाराष्ट्राला चांगले माहिती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाने नवाब मलिक यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे सगळे सुरु आहे, त्याकडे देशातून पाहिले जाते. त्यामुळे किती काळ चालणार हे मी म्हणालो. मात्र, शेवटी सत्याचाच विजय होतो.
ड्रग्ज प्रकरणानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारला अडचणीत आणायचे काम भाजपकडून केले जात आहे. मात्र, राज्य सरकार पूर्णपणे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातच्या एसटी कर्मचाऱ्यांनी बाहुल्या बनू नये. महाराष्ट्र सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. कामगारांनी एसटी कर्मचारी, महाराष्ट्रातील जनता यांचे हित पाहून राजकीय नेत्यांच्या मागे न लागता विचार करावा. राजकीय नेत्यांना कामगारांचे प्रश्न सुटावेत असे वाटत नाही. एसटी महामंडळ सरकारमध्ये विलिनीकरण करावे, अशी मागणी आहे. सुधीर मुनंगटीवार अर्थमंत्री असतानाचा विलिनीकरण शक्य नसल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. राज्यातील सरकार कामगारांच्या पाठिशी असले तरी सरकारवर काही बंधन आहेत, असे राऊत म्हणाले.