आज टणा टण उद्या मारतायत, एक दिवस तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

0
75
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडी, आयकर विभागाच्या वतीने कारवाई केली जात आहे. दरम्यान, आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप व मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज अजित पवार यांच्या संदर्भात काही लोकांवर काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. हे सर्व ठरवून केले जात आहे. भाजपातील लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या संपत्ती माहिती का? त्यांच्याही संपत्तीची माहिती ईडीकडे दिलेली आहेत. आमची मुलं बाळ काय रस्त्यावर राहतात का? आज ते टणा टण उद्या मारतायत, एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरवायची वेळ येईल.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,” माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करणारे लोक आहेत. ते पळून गेले नाहीत. त्यांना पळून लावलेले आहेत. त्यामागे केंद्राचा हात आहे. हे सर्व ठरवून चाललेलं आहे. आज अजित पवार यांच्या संदर्भात काही लोकांवर काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. हे सर्व ठरवून केले जात आहे. भाजपातील लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या संपत्ती माहिती का? त्यांच्याही संपत्तीची माहिती ईडीकडे दिलेली आहेत.

आमची मुलं बाळ काय रस्त्यावर राहतात का? आज ते टणा टण उद्या मारतायत, एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरवायची वेळ येईल. आम्ही इतके घाणेरडे राजकारण करत नाही . आज ज्या प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत. त्या एक प्रकारचे राजकीय षडयंत्र आहे. आज काहींवर डपावं टाकून कारवाई केली जात आहे. आम्ही कुणालाही घाबरत नाही. अशा प्रकारे घाणेरडे राजकारण करून सत्ता येईल असे वाटत असेल तर ते होणार नाही,” असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here