हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने आता शिवसेनेकडून भाजपवर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला असून कितीही ईडीच्या कारवाया करा, जन आशीर्वाद यात्रा काढावयाचा शिवसेनेवर काहीच फरक पडणार नाही. ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्यावर कारवाई केले जात आहे. यात भाजपचा हात असून भाजपकडून सुडाचे राजकारण केले जात असल्याची टीका राऊतांनी केली आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्राकडून एका प्रकारची खेळी केली जात आहे. अनिल परब यांच्यावरील आदींची कारवाई भाजपकडून सूडाच्या भावनेतून राजकारण करून केली जात आहे. या सूडाचा राजकारणाचा शेवट हा भाजपला भोगावा लागेल. केंद्र सरकारने जो एका एका मंत्र्याला पकडून आदींचा चौकशीचा फेरा मागे लावला जात आहे. तो धंदा केंद्राने बंद करावा.
राणेंबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, राणे म्हणजे एक वर्करची विकृती आहे. त्यांची भाषा हि केंद्राला साजेशी अशी असणारी नाही. त्यामुळे त्यांनी कितीही जन यात्रा काहाव्यात. टीका करावी. याचा शिवसेनेवर काडीमात्र फरक पडणार नाही. सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे काम करत आहे. शिवसेनेला नवीन रणनीती आखण्याचे काहीच कारण नसल्याचे राऊतांनी म्हंटले.