राणेंच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही, कुंडली बाहेर काढू; खासदार राऊतांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद हा सर्वपरिचित आहे. राणेंकडून नेहमी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. आज शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला. “आम्ही राणेंच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहे. वेळ आल्यास राणेंची कुंडलीच बाहेर काढू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नारायण राणे यांनी प्रहारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार असल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या उद्याच्या लेखामध्ये काय छापून येणार ते बघू. पण ते स्वतः चिखलात बुडालेले आहेत.

राणेंनी आमच्याबद्दल काही लिहिल्यास आम्हीही गप्प बसणार नाही. आम्हीसुद्धा राणेंचा रक्तरंजित इतिहास बाहेर काढू. आम्ही राणे यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहेत, असे राऊत यावेळी म्हणाले.

Leave a Comment