राज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढीव बिल संदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला राज ठाकरे म्हणाले. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. भाजपचे बहुतेक नेते पवारांना मोठा नेता मानतात. आता राज्यपालही शरद पवारांना नेता मानत असतील तर आनंदच आहे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे. भाजपचे लोकही पवारांना नेता मानतात. आता राज्यपालही मानू लागले आहेत. राज्यपालांना शरद पवारांचे मार्गदर्शन हवं असेल तर मी पवारसाहेबांना विनंती करेन की तुम्ही राज्यपालांना मार्गदर्शन करा, राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये अशी टीकाही संजय राऊतांनी राज्यपालांवर केली.

राज ठाकरे राज्यपालांना भेटले हा महाराष्ट्राचा अपमान

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. पण असं असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’