हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या राज्यात निवडणुक लढवण्यासाठी अनेक पक्ष सज्ज झाले असून आता शिवसेनेनं देखील उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना 50 ते 100 जागा लढेल अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे
संजय राऊत हे उत्तरप्रदेश दौऱ्यावर असून आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेच्या आगामी वाटचालीबाबत भाष्य केले. यावेळीला ज्या पद्धतीने आम्ही उत्तरप्रदेशात निवडणूक लढवण्याचे ठरवतो आहे. सगळे खासदार, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या निवडणुकीमध्ये लक्ष घालून आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार असतील अशी खात्री असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी- सपा युती
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपला पक्ष उत्तरप्रदेश मध्ये निवडणूक लढणार असून समाजवादी पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांसोबत आघाडी करेल अस पवारांनी स्पष्ट केले होते. उत्तरप्रदेशात कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन होणारच आहे असं म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला.